शेअर ब्रोकरचे 'मुडी' अँप्लिकेशनद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, २४ जून, २०२३

demo-image

शेअर ब्रोकरचे 'मुडी' अँप्लिकेशनद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग

मुंबई, दि. २४: स्टॉक एक्सचेंजचा कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना 'मुडी' या अँप्लिकेशनद्वारे अवैधरित्या ट्रेडिंग करून त्यासाठी लागणारा कुठलाही कर भरता सरकारची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका शेअर ब्रोकरला गुन्हे शाखा युनिट-११ ने बेड्या ठोकल्या आहेत. जतीन मेहता (वय, ४५) असे त्या शेअर ब्रोकरचे नाव आहे.


कांदिवली पश्चिमेकडील महावीरनगर मधील संकेत इमारतीत एक व्यक्ती कार्यालय थाटून स्टॉक एक्सचेंजचा कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना 'मुडी' या एप्लीकेशन मार्फत अवैधरित्या ट्रेडिंग करतो. तसेच त्याबरोबर कुठलाही कर न भरता शासनाची फसवणूक करीत असल्याचे माहिती युनिट-११ चे प्रभारी निरीक्षक विनायक चव्हाण यांना मिळाली होती. त्या माहितीची खातरजमा केल्यानंतर स्टॉक एक्सचेंज येथे कळवून त्यांचे पथकासह पोलिसांनी तेथे छापा टाकला असता जतिन मेहता हा त्या ठिकाणी पाच मोबाईल फोन, एक टॅब, लॅपटॉप, पेपर थ्रेडर, राऊटर, पेन ड्राईव्ह आणि ५० हजार रोख रकमेतसह सापडला.  अटक आरोपी हा 'मुडी' या एप्लीकेशनमार्फत ट्रेडिंग चे सर्व सौदे हे रोख स्वरूपात घेत असून त्या बदल्यात सरकारला कुठलाही प्रकारचा कर भरत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. स्टॉक एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांनी मेहताच्या लॅपटॉपची पाहणी करून त्यामध्ये ट्रेडिंगच्या व्यवहार पाहिले तेव्हा त्यामध्ये मार्च २०२३ ते २० जून २०२३ या कालावधीत स्टॉक एक्सचेंज बाहेरील शेअर्स खरेदी विक्रीचा टर्न ओव्हर काढला असता तो ४६७२ कोटी रुपयांचा आढळून आला. 


सदर रकमेवर शासनाचे सेक्युरिटी ट्रांजेक्शन टॅक्स, कॅपिटल गेम टॅक्स, स्टेट गव्हर्मेंट स्टॅम्प ड्युटी/टॅक्स, सेबी टर्न ओव्हर फी, स्टॉक एक्सचेंज ट्रेडिंग रेवेन्यू यांचे १ कोटी ९५ लाख ६४ हजार ८८८ रुपयांचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जतीन मेहता विरोधात चांदवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.


.trashed-1690203013-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%20%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_1
.trashed-1690203014-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%20%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_2

Press note



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *