देवनार पशुवधगृहाचे पासेस / पावती नसल्यास दक्षता पथकामार्फत कारवाई
समाज माध्यमांद्वारे प्रसारित चित्रफितीबाबत बाजार विभागाचा खुलासा
दिनांक २० जून २०२३ रोजी मध्यरात्री २.०० वाजता बाजार खात्याच्या विशेष दक्षता पथकांमार्फत शहर, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे येथे दैनंदिन गस्त चालू होती. कुर्ला पोलिस स्थानकाच्या हद्दीतील, भारत पेट्रोल पंपच्या मागील गल्लीत जिवंत बकरे सदर गस्त पथकास आढळून आले. सदर बकरे ज्या व्यक्तिकडे होते त्यास देवनार पशुवधगृहाचे पासेस / पावती आहे का ? याबाबत विचारणा करण्यात आली. परंतु, त्या व्यक्तिकडे पासेस / पावती नसल्याचे आढळून आले.
बाजार खात्याने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार व संबंधित नियमांनुसार दरवर्षीप्रमाणेच ‘बकरी ईद २०२३’ साठी आणण्यात आलेले बकरे हे प्रथमतः देवनार पशुवधगृह येथे आणून तेथील पासेस / पावती घेऊन नंतर पुढे न्यायचे आहेत.
मात्र, वर नमूद केलेल्या प्रकरणी संबंधित व्यक्तिने पासेस न घेतल्यामुळे सदर बकरे दक्षता पथकाच्या व्हॅनमधून देवनार पशुवधगृह येथे घेऊन जात असताना तेथील स्थानिक रहिवाशांनी सदर व्हॅन थांबविण्याचा प्रयत्न केला. तीन दक्षता व्हॅनपैकी दोन व्हॅन देवनार येथे निघून गेल्या. मात्र, एक व्हॅन स्थानिक रहिवाशांनी अडवून त्यातील बकरे उतरविले. उतरविलेले बकरे मालकाने देवनार पशुवधगृह येथे स्वतःहून आणून देण्याचे कबूल करुन त्याप्रमाणे सदर बकरे देवनार पशुवधगृह येथे जमा करण्यात आलेले आहेत.
सबब, जनमानसातील गैरसमज दूर होण्याच्या दृष्टीने प्रस्तुत खुलासा करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी धार्मिक वधासाठी प्राण्यांची खरेदी करताना ती देवनार पशुवधगृहातूनच करावी, असे आवाहन पुन्हा एकदा नागरिकांना करण्यात येत आहे.
(जसंवि/१९३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा