प्रवेशद्वारावरील बॅग स्कॅनर बंद अवस्थेत
मुंबई, दि. ३ : दहशतवादी हल्ल्याला काही वर्षे सरताच मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांतील सुरक्षा यंत्रणा कमकुवत होऊ लागल्या आहेत.
सीएसएमटी स्थानकातील बॅग, पार्सल तपासण्याची अद्ययावत स्कॅनर व अन्य उपकरणे बंद असल्याचे निदर्शनास आले असून बॅग स्कॅनर धुळखात पडल्याने प्रवाशांच्या सामानाची तपासणी बंद झालेली दिसून येत आहे.
सीएसएमटी स्थानकातून दररोज लाखो प्रवाशी ये-जा करीत असतात. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांची, सामानाची तपासणी करण्यासाठी सीएसएमटी स्थानकाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४,५ आणि ६ येथील आरक्षण आणि चौकशी केंद्रासमोरील बॅग स्कॅनर मशीन कित्येक दिवसांपासून बंद स्थितीत असल्याचे दिसत आहे. परिणामी, सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच म्हणावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा