पत्नी सोडून गेल्याच्या रागातून शेजाऱ्यांवर चाकूहल्ला, दोन जणांचा मृत्यू - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, २५ मार्च, २०२३

demo-image

पत्नी सोडून गेल्याच्या रागातून शेजाऱ्यांवर चाकूहल्ला, दोन जणांचा मृत्यू

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील ग्रँटरोड परिसरातील पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये भयानक हत्याकांड घडले आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका माथेफिरूने शेजारच्या पाच जणांवर केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी डी बी मार्ग पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

Secondfloor_03

ग्रँट रोड येथील पार्वती मेन्शन या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर दुपारी तीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने रागाच्या भरात पुढे येणाऱ्या सर्वावर हल्ला चढवला, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी चेतनला ताब्यात घेतले आहे. आरोपी चेतन याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी घर सोडून गेली. शेजारच्या लोकांमुळे पत्नी सोडून गेल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यातूनच हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. स्वतःचे कुटुंब सोडून गेल्यामुळे आरोपीने मानसिक तणावामुळे आणि रागाच्या भरात या व्यक्तींवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यातील गंभीर जखमींची नावे प्रकाश वाघमारे, जेनील भ्रमभट्ट, स्नेहल भ्रमभट्ट, जयंद्र मेस्त्री, इला मेस्त्री, अशी असून, यांच्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

Parvti%20mansion_10

%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%9F%20%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80%202023



db%20marg_page-0001

प्रेस नोट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *