बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी व्यक्तिमत्वाचा बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक असा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मितीसाठी व संरक्षणासाठी विविध गडदुर्ग बांधले. इतिहासाची साक्ष देणारे सृजनशीलता, शिल्पकलेला वाव देणारे तसेच बालमनावर शौर्याचे व स्वाभिमानाचे संस्कार घडविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून शिववैभव किल्ले (गडदुर्ग) प्रतिकृती निर्मिती शिल्पकला स्पर्धेद्वारे मुलांमध्ये संस्कृतीचे, स्वाभिमानाचे, शौर्याचे संस्कार होण्यास हातभार लागण्यासाठी; तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये या प्रतिकृतींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायम स्मरणात राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून "शिववैभव किल्ले (गडदुर्ग) प्रतिकृती निर्मिती शिल्पकला स्पर्धा"चे आज (दिनांक १८ ऑक्टोबर २०२२) जुहू चौपाटी, मुंबई येथे सकाळी ८ ते ११ या वेळेत आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत महानगरपालिकेच्या शाळेतील निवडक १८० विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. यात ६ कलाशिक्षक केंद्राचे ३०-३० विदयार्थ्यांचे गट तयार करण्यात आले. यात विदयार्थ्यांनी प्रतापगड, जंजिरा, शिवनेरी, रायगड, राजगड, सज्जनगड, वसई किल्ला, सिंहगड अशा इतिहासाची साक्ष देणाऱया अनेकविध किल्ल्यांच्या प्रतिकृती समुद्रकिऱयावरील रेतीत साकारल्या. यावेळी स्पर्धास्थळी शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) श्रीमती सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे) श्री. किर्तीवर्धन किरतकुडवे, अधिक्षक (शाळा) निसार खान, प्रशासकीय अधिकारी (शाळा) श्रीमती दिपिका पाटील, विभाग निरिक्षिका श्रीमती अस्मिता कासले, श्रीमती रोहिणी लाळगे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
यातील प्रत्येक गटातील अनुक्रमे १ ते ५ क्रमांकांच्या विदयार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध शिल्पकार श्री. दत्ताराम नेरूरकर यांनी केले.
सदर स्पर्धेचे आयोजन उप आयुक्त (शिक्षण) श्री. केशव उबाळे व शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ व श्री. राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कला अकादमी प्राचार्य श्री. दिनकर पवार यांनी निदेशक श्रीम. मंजिरी राऊत, श्री. भूषण उदगीरकर, श्री. योगेश मोरे; तसेच सर्व केंद्रप्रमुख व उपकेंद्रप्रमुखांच्या सहकार्याने उत्कृष्टरित्या केले.
जसंवि/२८७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा