पादचाऱ्यांना लुटणारे त्रिकुट गजाआड - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

demo-image

पादचाऱ्यांना लुटणारे त्रिकुट गजाआड

मुंबई, दि.२९ : मुलुंड पश्चिमेकडील एका इमारतीमधील दुकानाच्या समोर पकडून तिघांनी एका वृद्धाला लुटले. आजूबाजूला असणाऱ्यांना समजणार देखील नाही अशा पद्धतीने आरोपींनी चाकूचा धाक दाखवून वृद्धाची सोन्याची चैन, ब्रेसलेट, अंगठ्या असा लाखो रुपयांचा  ऐवज चोरून नेला. पण, मुलुंड पोलिसांनी त्या तिघांनाही शोधून अखेर त्यांना बेड्या ठोकल्या.

Hathkadi001


ठाण्याच्या किसन नगर मध्ये राहणारे मधुकर दळवी (वय, ६०)  मुलुंड मधील पोस्ट ऑफिस मध्ये कामानिमित्त आले होते. परंतु, पोस्ट ऑफिस बंद असल्याने ते माघारी फिरले. दळवी सेवाराम लालवानी मार्गावरील विद्याविहार मॅरेथॉन बिल्डिंगच्या खालील दुकानाच्या समोरील फुटपाथ  वर आले असता एका तरुणाने त्यांना अडवून ओळख काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मागून आलेल्या दोघांनी दळवी यांना चाकूचा धाक दाखवत त्यांचे सोन्याचे ब्रेसलेट, हातामधील तीन अंगठ्या व पाकिटा मधील दोन हजार रुपये रोख रक्कम काढून पोबारा केला. या प्रकरणी दळवी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.


 सहाय्य पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, उपनिरीक्षक कांचन थोरात तसेच कोळी, बोडके, वाळे, विंचू, पारधी, निकम, नलावडे या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार रमेश जयस्वाल, नरेश जयस्वाल, संजय मांगडे हे असल्याचे स्पष्ट झाले. मग पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावून आरोपींचा माग काढला असता हे तिघेही म्हापे येथील एका लॉज मध्ये लपले असल्याचे कळताच पोलिसांनी तेथे जाऊन तिघांना ताब्यात घेतले.





%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4_page-0001



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *