दोन कोटी ८० लाखांचा एमडी साठा जप्त
मुंबई, दि. २८ : मुंबई- पनवेल महामार्गावरील मानखुर्द परिसरात दोन नायजेरियन ड्रग्स माफिया मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटला मिळाली. त्या आधारे त्यांनी सापळा रचून मायकल चुकवुमा(वय, ३४) आणि ओझोकावेरी (वय, ४६) या दोघांना पकडले.
त्यांची अंगझडती घेतली असा एक किलोहुन अधिक वजनाचा उच्च प्रतीचा एमडी साठा हस्तगत केला. त्यांनी हा एमडीचा साठा कुठून आणला होता याचा शोध आम्ही घेत असल्याचे उपायुक्त दत्ता नालावडे यांनी सांगितले.

0 टिप्पण्या