पोलीस आयुक्तांच्या नावे सायबर फसवणुकीचा प्रयत्न - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

demo-image

पोलीस आयुक्तांच्या नावे सायबर फसवणुकीचा प्रयत्न

मुंबई, दि. २७ : एका खरेदी विक्री संकेतस्थळाची गिफ्ट कार्ड देण्याचा संदेश चक्क पोलीस आयुक्तांच्या नावे अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील भामट्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नावाने बनावट व्हाट्सअप प्रोफाइल तयार करून तोतयागिरी केली आहे.

IMG20211231152109


आरोपींनी फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. फणसळकर यांचे गणवेशातील छायाचित्र भामट्यांनी व्हाट्सअप प्रोफाइल म्हणून ठेवले. मात्र, कोणीही या फसवणुकीला बळी पडले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शुक्रवारी फसवणूक टोळीने तयार केलेला संदेश प्रसारित केला आणि सर्व पोलीस अधिकारी आणि नागरिकांना या फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले असल्याचे उपायुक्त (अभियान) संजय लाटकर यांनी सांगितले.

IMG-20220826-WA0019

पोलिसांचे खबरदारीचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *