मुंबई, दि.११ : दिनांक १०/०८/२०२२ रोजी सायंकाळी १७.०० ते १८.१५ वा.चे दरम्यान सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेत महिला दक्षता समितीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
सदरची बैठक आमचे अध्यक्षतेखाली पार पडली, सदर बैठकीस पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे, ०८ महिला समीती सदस्य व १० महिला पोलीस अंमलदार व गोपनीय शाखेचे कर्मचारी हजर होते.
महिला दक्षता समिती मिटींग मध्ये वपोनी यांनी महिला सदस्यांना खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले. आगामी काळात साजरे होणारे सण/उत्सव - नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पतेती, गोपाळकाला व १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनच्या अनुषंगाने तसेच १५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त हर घर तिरंगा या संकल्पनेबाबत अवगत करून स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी प्रोत्साहित करून भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते-अजाणतेपणे राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घेणे बाबत जाणीव करुन देण्यात आली तसेच जनजागृती करण्यात आली.
त्याचप्रमाणे महिलांना प्रवासात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय सुचविले, महिलांनी रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या किंवा लोकल गाडीच्या प्रथम वर्ग डब्यात एकटीने बसू नये तर जनरल महिला /पुरुष डब्ब्यात बसून प्रवास करावा. महिलांनी प्रवासादरम्यान मौल्यवान दाग - दागिने परिधान करू नयेत. रेल्वे प्रवासादरम्यान संशयी इसम, बेवारस बॅग,चोर इत्यादी दिसल्यास त्याची माहिती ड्युटीवरील पोलिसांना अथवा रेल्वे पोलीस हेल्प लाईन १५१२ येथे फोन द्वारे माहिती द्यावी. तसेच सतर्क राहण्या बाबत सूचना देण्यात आल्या.
महिला दक्षता समितीच्या सदस्य यांनी सदर मिटींगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बैठक संपल्यानंयर पोलीस ठाणे समोरील प्रांगणात भारतीय राष्ट्रध्वज सोबत घेऊन हर घर तिरंगा बाबत जनजागृती करण्यात आली.
Grp
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा