दोघींची हत्या अन दोघांची आत्महत्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १ जुलै, २०२२

दोघींची हत्या अन दोघांची आत्महत्या

 कांदिवली येथील घटना

मुंबई : कौटुंबिक वादातून पोटच्या मुलीने ड्रायव्हरला हाताशी धरून आई आणि बहिणीची हत्या केली. हत्येनंतर मुलीने आणि ड्रायव्हरने देखील गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कांदिवली येथे घडली. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी पोलिसांना चार पानाचे सुसाईड नोट आढळून आली आहे. या घटनेची माहिती कांदिवली पोलिसांनी किरणचा पती आशिषला कळविली आहे.



आशिष यांच्या वडिलांचा कांदिवली पश्चिम येथे एक दवाखाना असून तो सध्या बंद आहे. तेथे किरण, मुस्कान आणि भूमी राहायचे. मुस्कान ही किरणच्या पहिल्या पतीपासून मुलगी आहे. पतीपासून फारकत घेतल्यानंतर काही वर्षांपूर्वी किरणने आशिषशी विवाह केला. भूमी ही त्याची मुलगी आहे. आशिषकडे शिवदयाल हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वी अशिष आणि किरण यांच्यात वाद सुरू होते. वाद झाल्याने आशिष हा बंगळुरूला राहू लागला. तर किरणकडे भूमी आणि मुस्कान हे कांदिवली येथे राहायचे.


कौटुंबिक वादातून आईला धडा शिकविण्यासाठी भूमीने शिवदयाल याची मदत घेतली. बुधवारी रात्री शिवदयाल हा किरण यांच्या घरी आला. त्याने दुसर्‍या मजल्यावर झोपलेल्य किरण आणि मुस्कानच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्या मायलेकींनी वाचवण्यासाठी बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिवदयालने बाहेरून दरवाजा लावून घेतल्याने त्या दोघींना बाहेर पडता आले नाही. रक्तस्राव झाल्याने त्या दोघींचा मृत्यू झाला. त्यानंतर भूमी आणि शिवदयालने मिळून एक सुसाईड नोट लिहिली. सुसाईड नोट लिहिल्यानंतर भूमीने आणि शिवदयालने गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला आणि त्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. काही वेळातच कांदिवली पोलीस आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज