मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर गुढीपाडवा निर्बंधमुक्त झाल्याने राज्यभरात घरोघरी गुढी उभारण्यात आली.
परळ ते लालबाग मध्ये शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी तरुण-तरुणी पारंपारिक मराठमोळ्या वेशात मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बाईक रॅलीमध्येही सामील होते. एकूणच लालबाग परीसर यामुळे भगवामय झालेला दिसून येत होता.
यंदा 'महाराष्ट्र मंजिरी' ही थीम वापरण्यात आली होती. त्यात शिवाजी महाराज, रयत राज चिन्ह असलेले बुलेटस्वरांचे पथक, त्यामगोमाग शिवरायांची पालखी, स्वयंसिद्ध महिला।मंडळ, स्त्री सांस्कृतिक पथक तसेच भारतमातेच्या पालखीचा समावेश होता. बा. रायगड परिवाराने यावेळी गडकोट दुर्गसंवर्धन चलत चित्र सादर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा