Ticker

विभागातील मंडळे कल्पतरू समूहाच्या समाजसेवेचा आदर्श घेताहेत

 कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

मुंबई, दादासाहेब येंधे : चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या ३० व्या रक्तदान शिबिरात १३८ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास वार्प इंजिनियरींग या कंपनीचे डायरेक्टर श्री. प्रभूदास गोला यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले.

३० वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखल्याबद्दल समूहाला संबोधताना शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या.  तर रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर यांनी मंडळाला संबोधताना म्हटले की, या विभागातील इतर सर्व मंडळे कल्पतरू समूहाच्या समाजसेवेचा आदर्श घेत आहेत, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. एवढेच नव्हे तर या मंडळाने समाजसेवेचा एक वसा उचलला आहे. 

व्हिडीओ पहा...👇

सदर रक्तदान शिबिरास नायर रुग्णालयाचे समाजविकास अधिकारी श्री. पवार, श्री. रविशंकर टोके, महावीर इंटरनॅशनल, मुंबई चे अध्यक्ष श्री. पारसमल गोलेचा, चिंचपोकळी चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष राजन डीचोलकर, समाजसेवक काका कदम तसेच मराठी कलाकार मिलिंद पेडणेकर यांनी हजेरी लावली.


सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, विनायक, सुजित, नेहा येंधे, महेश नानचे, दिनेश उतेकर, मिलिंद चाळके, स्वप्नील, अनंत घाडीगांवकर, ओमकार नानचे, अमेय परब, आनंदा पाटील, संजीव केरकर, चारुदत्त लाड, गणेश शिवणेकर, वैष्णवी, अथर्व साळसकर, संतोष रायकर, आदित्य देसाई, विनायक येंधे, शिरीष ताम्हणकर, समीर नाईक, नंदकुमार साळसकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.























नोट : विविध विषयांवरील लेख वाचण्यासाठी खालील माझी समृद्धी या लिंकवर क्लिक करा, follow करा.
लेख आवडल्यास इतरांनाही शेअर करा. 👇

                                                    माझी समृद्धी




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या