क्षयरूग्णांवर उपचार सुरु करण्याची सुविधा कार्यरत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

demo-image

क्षयरूग्णांवर उपचार सुरु करण्याची सुविधा कार्यरत

‘ECHO Platform’ माध्यमाद्वारे ‘Virtual Difficult to Treat TB Clinic, MUMBAI’ यांची मुंबई शहरातील औषध प्रतिरोधी (Drug Resistant) क्षयरूग्णांच्या उपचार सुरु करण्याची सुविधा कार्यरत 


सन २०२५ पर्यंत भारत देश क्षयमुक्त करण्याचे ध्येय भारत सरकारने घोषित केले आहे. भारतातील एकूण क्षयरोग रूग्ण संख्येपैकी मुंबईमधे सुमारे ३ टक्के ‘औषध संवेदनशील’ (Drug Sensitive) क्षयरूग्ण व १४ टक्के ‘औषध प्रतिरोधी (Drug Resistant) क्षयरूग्ण’ असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे. महाराष्ट्रातील एकूण औषध प्रतिरोधी क्षयरूग्ण संख्येपैकी सुमारे ५८ टक्के ‘औषध प्रतिरोधी क्षयरूग्ण” हे मुंबईत आढळतात. मुंबईमध्ये दरवर्षी सरासरी ४ ते ५ हजार औषध प्रतिरोधी क्षयरूग्णांचे निदान करण्यात येत आहे. 


मुंबईतील काही औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांच्या थुंकीचा अहवाल क्लिष्ट असल्याकारणाने त्यांना जिल्हा स्तरावर औषधोपचार सुरू करणे कठीण जाते व अशा रूग्णांना उपचार सुरू करण्याकरिता ‘नोडल सेंटर’वर संदर्भित करावे लागते. हया रूग्णांनी प्रवास केल्यास इतर नागरिकांना क्षयरोगाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, संबंधीत क्षय रूग्णांचा प्रवास कमी करणे व त्यांना त्यांच्या घराशेजारीच उपचार उपलब्ध होण्याची सुविधा असणे ही काळाची गरज आहे.


वरील अनुषंगाने सदर प्रकरणांचे मार्गदर्शन करण्यास मुंबईकरिता ‘ECHO Platform’ हा उत्कृष्ट असा पर्याय उपलब्ध आहे व मुंबईतील औषध प्रतिरोधी क्षयरुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबईकरिता स्वतंत्र ‘Virtual  Difficult to Treat TB Clinic’ कार्यरत करण्याचे योजिले आहे. राज्य क्षयरोग विभाग स्तरावर ‘Difficult to Treat TB Clinic’ समितीमध्ये मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांचा सहभाग असल्याकारणाने त्यांच्या ज्ञानाचा व उपचार पद्धतींचा लाभ मुंबईतील औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांना मिळाल्यास उपचाराकरीता ते बहुमोल ठरेल. त्या अनुषंगाने मुंबईतील MDR व XDR रूग्ण संख्या व वरील सर्व बाबी लक्षात घेता, केंद्रीय व राज्य स्तराच्या  धर्तीवर  ‘Virtual  Difficult to Treat TB Clinic’  मुंबईकरिता ह्या सुविधेचा दिनांक २४ फेब्रुवारी २०२२, दुपारी ३ वाजता, निःक्षय दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता व कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे ह्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत स्वतंत्र ‘Virtual  Difficult to Treat TB Clinic, MUMBAI’  चे ‘ECHO Platform’ वापरुन कार्यान्वित करण्यात आले आहे.


औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांना उपचार सुरू करण्याकरिता मुंबईतील विविध जिल्हयांमध्ये २२ औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्रे (DR TB Centers) कार्यरत असून, ह्यापैकी ४ औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्रे ही मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत ‘नोडल सेंटर’ म्हणून कार्यरत आहेत. इतर औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्रे ही हया ‘नोडल सेंटर’शी संलग्न करण्यात आलेली आहेत. 


सद्यस्थितीत अशा औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांचा उपचार सुरू करण्याकरिता केंद्रीय क्षयरोग विभाग व राज्य क्षयरोग विभाग यांच्या स्तरावर व्हर्च्युअल ‘Difficult to Treat TB Clinic’ च्या माध्यमातून तज्ज्ञ व विशेषज्ञांच्या मार्गदर्शनानुसार उपचार करण्याची सुविधा कार्यरत आहे. परंतु, सदर सुविधा पूर्ण राज्यासाठी असल्याकारणाने व प्रलंबित प्रकरणांचे प्रमाण जास्त असल्याकारणाने मुंबईतील औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांना उपचार सुरू करण्याकरिता व मार्गदर्शन मिळण्यास विलंब होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबईसाठी स्वतंत्र सुविधा आता उपलब्ध होत आहे. 


कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. गोमारे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘Virtual  Difficult to Treat TB Clinic, MUMBAI’  हे प्रौढ औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांच्या उपचाराकरिता महिन्यातून एक वेळा व औषध प्रतिरोधी बाल क्षयरोग रूग्णांकरीता दोन महिन्यातून एकदा अशा सभा ‘व्हर्च्युअल कॉन्फरन्स’च्या माध्यमातून घेण्यात येईल. ‘Virtual Difficult to Treat TB Clinic, MUMBAI’ येथे रूग्णांना संदर्भित करण्याकरिता स्वतंत्र ई-मेल पत्ता कार्यरत करण्यात आला असून तो mum-dt3c@gmail.com असा आहे. 


‘Virtual Difficult to Treat TB Clinic, MUMBAI’ चे औषध प्रतिरोधी क्षयरूग्णांना होणारे अपेक्षित फायदे –

औषध प्रतिरोधी क्षयरूग्णांचे ‘नोडल सेंटर’ला संदर्भित करण्याचे प्रमाण कमी होईल.

औषध प्रतिरोधी क्षयरूग्णांना औषध सुरू करण्याकरिता प्रवास करावा लागणार नाही व परिणामी इतर नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका टळेल.

जिल्हा स्तरावरील विशेष तज्ज्ञ व आरोग्य कर्मचा-यांचा ज्ञानामध्ये वृद्धी होण्यासह त्यांच्या कार्यक्षमतेचेही बळकटीकरण होण्यास मदत होईल.

औषध प्रतिरोधी क्षयरूग्णांना लवकरात लवकर योग्य उपचार सुरू करणे शक्य होईल.














(जसंवि/ ५९६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *