कोविड संसर्ग काळातील खासगी - सार्वजनिक सहभागातून झालेल्या यशस्वी कामगिरीच्या धर्तीवर क्षय रुग्णांनाही
मिळणार उपचार
कोविड – १९ विषाणू संसर्ग नियंत्रण करताना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमध्ये खासगी – सार्वजनिक सहभागातून करण्यात आलेली कामगिरी देखील मह्त्वाची ठरली. हे लक्षात घेता, सन २०२५ पर्यंत मुंबईतून क्षयरोग निर्मूलन करण्याकरीता खासगी क्षेत्रातील रुग्णालयांसमवेत भागीदारी करण्याचा निर्णय महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
कोविड – १९ विषाणू संसर्ग नियंत्रण करताना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमध्ये खासगी – सार्वजनिक सहभागातून करण्यात आलेली कामगिरी देखील मह्त्वाची ठरली. हे लक्षात घेता, सन २०२५ पर्यंत मुंबईतून क्षयरोग निर्मूलन करण्याकरीता खासगी क्षेत्रातील रुग्णालयांसमवेत भागीदारी करण्याचा निर्णय महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
कोविड १९ संसर्ग कालावधीत मुंबईतील नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मदतीने विविध आरोग्य सुविधा पुरविल्या. कोविड रूग्णांना उपचार, विलगीकरण यासोबत सध्या सुरु असलेली कोविड १९ लसीकरण मोहीम या सर्वांमध्ये खासगी क्षेत्राबरोबर महानगरपालिका प्रशासनाने भागीदारी यशस्वी करुन दाखविली. हा अनुभव पाहता, महानगरपालिकेने सन २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खासगी रुग्णालयांना सोबत घेण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दूरदृश्य प्रणालीद्वारे खासगी क्षेत्रातील भागीदारांसोबत बैठक घेतली.
कोविड नियंत्रण व्यवस्थापनामध्ये जी ४३ खासगी रूग्णालये महानगरपालिका प्रशासनासमवेत कार्यरत होती, त्यांना क्षयरोग निर्मूलन – २०२५ करीता सहभागी होण्याकरीता निमंत्रित करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामधील खासगी रूग्णालये यांना सहभागी होण्याकरीता उपलब्ध असलेल्या उपक्रमाची माहिती या बैठकीत दिली. हिंदुजा रूग्णालय, युनिसन मेडीकेअर, डॉक्टर्स फॉर यू, के. जे. सोमय्या रूग्णालय, सर्वोदय रूग्णालय या रुग्णालयांमध्ये औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्र उपक्रम राबविण्यात येत आहेत. या खासगी रुग्णालयांचेही डॉ. गोमारे यांनी अभिनंदन केले.
मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ. (श्रीमती) प्रणीता टिपरे यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग दूरीकरण ध्येय गाठण्याकरीता खासगी रूग्णालयांच्या सहभागाने राबविण्यात येणाऱया उपक्रमांबाबत तसेच खासगी रूग्णालयांकडून अपेक्षित योगदानाबाबत व त्यांना महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱया सुविधांबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने रूग्णांकरीता दोन नवीन औषधे उपलब्ध होतील. सदर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरीता रूग्णालयांनी करार केल्यास विकेंद्रीकरण करण्याबाबत मदत होईल व क्षयरूग्णांना घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
खासगी क्षेत्राबरोबर भागीदारी बाबतच्या सत्रानंतर बेस्ट परिवहन व विद्युत पुरवठा विभाग मुंबईचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सिंघल यांनी बेस्टच्या डायमंड लेव्हल कॉर्पारेट सभासद पदाबाबत अनुभव कथन केला.
(जसंवि / ३७९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा