मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी राज्यभरातील ४० समुद्रकिनाऱ्यांवर समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर शनिवारी दादर चौपाटी येथे सकाळी १० वाजता समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
यावेळी या स्वच्छता अभियानात मनसेचे नेते अमित ठाकरे तसेच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वतःहून समुद्रकिनारी सापडलेला प्लास्टिकचा कचरा उचलला. यावेळी अमित ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचे आपण जतन करून तो सुरक्षित ठेवायला हवा मात्र त्यात प्लास्टिकचा कचरा टाकला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा