शनिवारपासून १०० महिला विशेष बस
मुंबई : बेस्ट उपक्रमाने बॉस सेवांचा विस्तार करताना महिलांसाठी विशेष बस सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवार पासून १०० अतिरिक्त बस सुरू केल्या जाणार आहेत. त्यापैकी दहा बस महिला विशेष असून उर्वरित बस महिला प्रवाशांना प्राधान्यक्रमाने प्रवेश या पद्धतीने चालवल्या जाणार आहेत.
कोरोना संसर्गापासून अत्यावश्यक सेवांपाठोपाठ सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्ट उपक्रमाकडून पुरवली सेवा पुरवली जात आहे. सर्वसामान्यांना लोकल प्रवास बंद करण्याच्या कालावधीपासून आजपर्यंत बेस्टने अविरत सेवा दिली आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या सेवेचा फायदा दररोज तीस लाख प्रवासी घेत आहेत. त्यात महिला प्रवाशांची संख्याही मोठी आहे. महिलांसाठी पालिकेकडून काही विशेष बस चालवल्या जातात. त्यात अजून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार भाऊबीजेच्या निमित्ताने १०० महिला विशेष बस सेवा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा