नाहूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची टीसीला मारहाण - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०२१

नाहूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची टीसीला मारहाण

मुंबई : मध्य रेल्वेच्या नाहूर रेल्वे स्थानकावर एका टीसीला प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


नाहूर रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेला मुख्य तिकीट निरीक्षक सुभाष जोशी यांच्या निरीक्षणाखाली संदीप चितळे व अन्य दोन तिकीट निरीक्षक आणि दोन आरपीएफचे जवान स्टाफच्या मदतीने ड्युटी बजावत होते. त्यावेळी एक प्रवासी टीसिंना बघून पळाला आणि पायऱ्यांवरून घसरून पडला. या कारणामुळे काही महिला प्रवाशांनी चितळे यांना जाब विचारत त्यांना मारहाण केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.













Video : viral


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज