दहीहंडीला सरकारने परवानगी नाकारली
मुंबई : राज्यातील गोविंदा पथकांशी संवाद साधताना काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचवण्याचा महाराष्ट्राने प्राधान्य दिले, हा संदेश आपण सर्व मिळून जगाला देऊन संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले. सरकारचे प्रथम प्राधान्य जनतेचे प्राण वाचवण्याला आहे हेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गोविंदा पथकांची घागर उताणी राहणार आहे.
0 टिप्पण्या