उंदराने कुरतडला डोळ्याखालचा भाग
मुंबई, दादासाहेब येंधे : राजावाडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या श्रीनिवास यलप्पा या २४ वर्षीय रुग्णाच्या डोळ्याखालचा भाग उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक आरोप या रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. मेंदूज्वर तसेच यकृतामध्ये बिघाड असल्यामुळे या तरुणाला दोन दिवसांपासून राजावाडी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्याचे नातेवाईक त्याला भेटावयास गेले असता, त्याच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. या रुग्णाच्या डोळ्याजवळचा भाग उंदराने करतडला असल्याचा आरोप या रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. ही बाब गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. किशोरीताई पेडणेकर म्हणाल्या की, हा वॉर्ड सर्व बाजूनी बंद असल्याने कुठूनही उंदीर जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. हा विभाग तळमजल्यावर असल्याने पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा उंदीर आयसीयू मध्ये गेला असावा, असेही त्या म्हणाल्या. राजावाडी रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनीही त्रास मागील दोन वर्षांपासून होत असल्याचे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा