रविवार दि. १८.४.२०२१ रोजी मेगा ब्लॉक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

रविवार दि. १८.४.२०२१ रोजी मेगा ब्लॉक

मध्य रेल्वे रविवार दि. १८.४.२०२१ रोजी देखभाल काम करण्यासाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक परिचालीतकरणारआहे.


 माटुंगा-मुलुंड अप व डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणा-या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाईल. त्यानंतर पुढे डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या दरम्यान या सेवा  विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत.

ठाणे येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५५ पर्यंत सुटणा-या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या दरम्यान या सेवा नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर न थांबता  पुढे अप धिम्या मार्गावर  पुन्हा वळविण्यात येणार आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर लाइन मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी / वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.०२ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे / गोरेगावकडे जाणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता  पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता  गोरेगाव/वांद्रे  येथून सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.५८ वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
 
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.
            
पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत.  प्रवाशांना होणारी गैरसोय रेल्वे प्रशासनाला सोबत घेण्याची विनंती आहे.
















 --- --- ---
 दिनांक: १६ एप्रिल २०२१
 प्रप क्रमांक 2021/04/50 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज