भाषा विद्यापीठ स्वतंत्र भवनाची घोषणा, नवी मुंबईत स्थापन होणार महाराष्ट्र भवन
मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही अर्थसंकल्पात मराठीसाठी काहीच कसे नाही अशी खंत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी मंगळवारी (दि.९) विधान परिषदेत बोलून दाखवल्यानंतर दिवसभरातून सूत्रे फिरली आणि राजभाषा मराठीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली.
मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे मराठी भाषा भवन, नवी मुंबईत महाराष्ट्र भवन आणि मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला दिलेल्या उत्तरात मराठी भाषा भवनाची घोषणा केली. ते म्हणाले, मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे शिक्षण विभागाच्या जवाहर बालभवनला लागून असलेल्या भूखंडावर मराठी भाषेला साजेसे भाषा भवन साकारले जाईल. त्याचप्रमाणे नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा