सीएसएमटी स्थानकात ५ वॉल
मुंबई : प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व प्रवाशांच्या माहितीसाठी पाच व्हिडीओ वॉल लावले आहे. त्याद्वारे प्रवाशांना स्थानकातील प्रवासी सुविधांची माहिती नकाशाद्वारे मिळेल मध्य रेल्वेने या व्हिडिओला आणखी १७ स्थानकांत लावण्याचा निर्णय घेतला आहे.
बऱ्याचदा मुंबई बाहेरील प्रवासी पर्यटक लोकलने प्रवास करतात. अशावेळी त्यांना प्रवासी सुविधा किंवा कोणता प्लॅटफॉर्म कुठे आहे याची माहिती सहज मिळत नसल्याने त्यांना इतर प्रवाशांकडे चौकशी करावी लागते या अभिनव उपक्रमामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.

0 टिप्पण्या