Ticker

6/recent/ticker-posts

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट उपाय


"स्मार्ट सहेली" मार्फत महिला प्रवाशांमध्ये आरपीएफची जनजागृती

मुंबई :  रेल्वे प्रवासात महिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी स्मार्ट ही लिहा उपक्रम मध्य रेल्वे रेल्वे सुरक्षा दलाने हाती घेतला आहे या अंतर्गत ८५ व्हाट्सअप ग्रुप निर्माण करून सात हजार आठशे एक सहलींच्या माध्यमातून मध्य रेल्वेवरील सर्व लोकल फळांमधील महिलांना सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत सेक्टर सहेली, स्टेशन सहेली, ट्रेन सहेली असे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येतील. प्रत्येक ग्रुप मध्ये प्रशिक्षित आरपीएफ महिला कर्मचारी, नियमित प्रवास करणाऱ्या महिला यांचा समावेश असेल. या सर्व व्हॉट्सअप ग्रुपची देखरेख विशेष देखरेख पथकातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येईल. यापूर्वी सुरू असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मधून मर्यादित लोकल फेऱ्यांमध्ये सुरक्षा पुरवणे शक्य होते हे टाळण्यासाठी स्मार्ट सहेली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात सध्या पाच हजार सहेलींचा- महिला प्रवाशांचा समावेश करण्यात आला आहे, असे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अशरफ यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या