Ticker

6/recent/ticker-posts

वर्दीवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करा

 वाहतूक पोलिसाला मारहाण

मुंबई, दादासाहेब येंधे : काळबादेवी परिसरातील कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसावर महिलेने हात उगारल्याची घटना समोर आली आहे. हेल्मेट न घातल्यामुळे या महिलेसोबत असलेल्या व्यक्तीवर कारवाईदरम्यान शिव्या दिल्याचा आरोप करीत या महिलेने पोलिसाची कॉलर पकडून त्यांना भररस्त्यात मारहाण केली. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आलं असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. 

काळबादेवी येथील कॉटन एक्स्चेंज नाका येथे शुक्रवारी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ पार्टे हे कर्तव्य बजावत होते. यावेळी मोहसीन खान व सादविका तिवारी हे दोघेजण तिथे दुचाकीवरून आले. मोहसीन याने हेल्मेट न घातल्याने पोलीस पार्टे यांनी हेल्मेट न घातल्याने त्यास रोखले. दंडात्मक कारवाई करत असताना या दोघांनी पार्टे यांच्याशी कॅड घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, सादविका हिने पार्टे यांच्या गणवेशाची कॉलर पकडली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवाय केली. 

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्या दोघांनाही लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणेत आणले. सरकारी कामात अडथळा आणि पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. 

व्हिडिओमध्ये घटनास्थळी पोहोचलेल्या महिला पोलीस तसेच सर्वसामान्य नागरिक सादविका हिला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पार्टे यांनी जर शिव्या दिल्या असतील तर रीतसर तक्रार करा, असे सर्व सांगत असताना ही महिला पार्टे याना मारत सुटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या