मुंबई, दि. २५ : दिनांक २०/१०/२०२३ रोजी १८.५० वा. सुमारास इसम नामे यश जितेद्र जैन वय २८ वर्ष हे, गिता भवन हॉटेल बाहेर शामलदास गांधी मार्ग मुंबई ०२ येथे सिगारेट ओढत असताना दोन इसम हे मोटारसायकल वरून आले त्यानी त्याना पोलीस असल्याचे सागुन सदर परीसरात सिगारेट पिणास मनाई आहे म्हणुन त्याच्या कडुन दंड म्हणुन दोन हजार रूपये पावती न देता घेतले, व तेथुन निघुन गेले याबाबत त्यानी तेथे जवळच वर्धमान जंक्शन येथे वाहतुक पोलीस म्हणुन कर्तव्यास असलेले पो.ह.३१२४४/। सुरेश जाधव/ काळबादेवी वाहतुक विभाग, मुंबई यांना सदर बाबत सांगितले यावर पो.ह-३१२४४/सुरेश जाधव यांनी सदर इसमाविरूध्द दिलेल्या तक्रारीवरून गु.र-क्र ६१०/२३ कलम १७०,४१९,४२०, ३४ भा.द.वि नोंद करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाला मेट देवुन सदर ठिकाणी चौकशी तपास करून तांत्रिक तपासाच्या अधारे आरोपीताचा माग काढुन गुप्त बातमीदाराकडुन त्याची ओळख पटवुन सदर आरोपीताना शिताफिने शोध घेवुन अटक केली.
अटक आरोपीतांचा तपशील:-
१) सुजीत पाडुरंग शिंदे वय ३७ वर्षे धंदा कॅटरीग रा. ठी. स्वदेशी मिल चाळ, चाळ नं २०१/४१ , चुनाभटटी, मुंबई २) मनोज मनोहर परब वय ३० वर्षे धंदा नोकरी, रा. ठी. २६ऐ , ओमकारेश्वर सोसायटी, थॉमस कम्पाउट, आयसी कॉलनी, बोरीवली पश्चिम, मुंबई
लो. टी. मार्ग पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाने नमुद गुन्हयामधील अटक आरोपीतांकडुन गुन्हयातील मालमत्ता हस्तगत केली आहे. नमुद गुन्हयातील उपरोक्त नमुद आरोपी कर ०२ यांच्या विरूध्द बोरीवली पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग), मुंबई, मा. डॉ. मोहित कुमार गर्ग, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, मुंबई, श्रीमती जोत्स्ना रासम, सहायक पोलीस आयुक्त, पायधुनी विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर वाघ यांच्या अधिपत्याखालील पो. नि. (गुन्हे) कैलास करे स.पोनि. सुशील वंजारी , पो.उ. नि प्रदिप मिताडे, गुन्हे प्रकटीकरण पथकांचे पो.ह. रउत, पो. शि. खांडेकर, पो-शि सातपुते, पो. शि. साटम, पो. शि शिंदे, पो. शि गाडेकर, यांनी केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा