शरीराचे तीन तुकडे करून बॅगमध्ये भरले
मुंबई, दि. २७ : मुंबईच्या वडाळा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ट्रकच्या मागे अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेचं वय अंदाजे ३० ते ४० वर्षाच्या दरम्यान असल्याची माहिती मिळत आहे. या महिलेच्या शरीराचे तीन तुकडे करण्यात आले आहेत. त्यापैकी डोकं, धड आणि एक पाय पोलिसांना सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पोर्ट ट्रस्ट येथील 'आमच्या गस्ती' या पथकाला एक संशयास्पद पिशवी सापडली होती.

त्या पिशवीत एक जळालेला मृतदेह होता. तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताबोडतोब पुढचा तपास सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, BPT (मुंबई पोर्ट ट्रस्ट) च्या ट्रॅक पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वडाळा परिसरात एक मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी वडाळा पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी सुरु केली आणि लगेच तो मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला.
यासोबतच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानेही आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेची निर्घृण हत्या एक ते दोन दिवसांपूर्वी झाली असावी, असा अंदाज पोलिसांचा आहे. महिलेचा मृतदेह एका पिशवीत बांधून ठेवला होता. संशय आल्यानं पिशवीची तपासणी केली असता अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा