मुंबई, दि. ६ : पाटणा येथील प्रॉपर्टी डीलर प्रेम पासवान यांची हत्या करून आठ महिन्यांपासून फरार असलेल्या छपरा टोळीशी संबंधीत शूटर नवीनकुमार प्रियकुमार रंजन (वय,२२) याला साकीनाका पोलिसांनी रविवारी अटक केली. हत्येबाबत बढाया मारण्याच्या नादात तो तावडीत सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिहार मधील दानापुर गावचा रहिवासी असलेला रंजन मुंबईत आला आणि शहरात लपला होता. पीडित प्रेम पासवान हा पाटणा येथील प्रॉपर्टी डीलर होता आणि हबीबपूर परिसरातील १.५ बिघा जमिनीच्या वादात अडकला होता. पासवानच्या हत्येप्रकरणी पाटणा येथील पारसा बाजार पोलिसांनी याआधी पासवानच्या व्यावसायिक भागीदारासह दहा जणांना अटक केली होती. ज्यात तो मुख्य संशयित देखील आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रंजन गेल्या दहा दिवसांपासून मुंबईत सकिनाका परिसरातील ब्लॉसम डॉमेंटरी मध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी, साकिनाका येथे स्थानिकांशी संवाद साधताना, रंजनने सहज उघड केले की, तो बिहारचा शूटर होता आणि पासवानच्या हत्येत त्याने भाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा