मुंबई, दि. २१ : परराज्यातुन मुंबई शहर व उपनगरामध्ये तरुणांना अंमली पदार्थ विकी करणाऱ्या डूग्स् पेडलरवर व अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत मा. वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्यावरुन वडाळा, शिवडी, चार रस्ता या परिसरात अंमली पदार्थ विकी करणाऱ्या एकुन ३ व्यक्तींना जेरबंद करण्यात आले असून त्यांचे कडुन एकुन ४ किलो ७७३ ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने त्यांचेविऊध्द अं.प.वि. कक्ष बांद्रा युनिट, गुन्हे शाखा, मुंबई यांनी गु.र.नं. ८१/२०२३, कलम ८(क) सह २०(क), २९ एन.डी.पी.एस अँक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंद करुन नमुद अटक आरोपींकडून एकूण ४ किलो ७७३ ग्रॅम वजनाचा “चरस” हा अंमली पदार्थ, तीन मोबाईलसह (अं.किं.१,४३,१९,०००/- रु.) जप्त करण्यात आला आहे.

नमुद अटक आरोपी यांचेकडुन अधिक माहिती घेता ते इसम चरस हा अंमली पदार्थ परराज्यातुन तस्करी करुन मुंबई शहरात व उपनगरातील परिसरात विशेषत: तरुणांना विक्री करत असल्याचे माहिती मिळुन आली आहे. अटक आरोपींकडे त्यांचे आणखी कोणी साथीदार अथवा त्यांची एखादी टोळी आहे काय? याबाबत सविस्तर तपास बांद्रा युनिट, अंमली पदार्थ विरोधी कक्ष करत आहे.
अशाप्रकारे बृहन्मुंबई पोलीस हे अंमली पदार्थ मुकत समाज निर्मितीसाठी सतत प्रयत्नशिल आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, मा.विशेष पोलीस आयुकत, श्री.देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशि कुमार मीना, मा.पोलीस उप आयुकत श्री.प्रकाश जाधव, मा. सहा. पोलीस आयुकत श्री. काशीनाथ चव्हाण (अति.कार्यभार), अंमली पदार्थ विरोधी कक्ष, पो.नि. किरण लोंढे(प्रशासन) अंपवि. यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष, बांद्रा युनिटचे प्रपोनि. संजय चव्हाण यांचे नेतृत्वाखाली, स.पो.नि. सुरेश भोये, स.पो.नि. श्रीकांत कारकर, स.पो.नि. दादा गायकवाड, पो.ह.क. ०४०८४८/मांढरे, पो.शि.क. ००३०४/सौंदाणे, पो.शि.००८१०५६/राठोड, पो.शि.क. ०८०६२०/खारे, पो.शि.क. ०९०२७६/काळे, पो.शि.क. ११३१३५/शेडगे, पो.शि.चा.क.१९०६०८/भोर यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दादा गायकवाड हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा