मोटर कार चोरी करणारा तसेच कारची काच तोडून किंमती वस्तू चोरी करणारा आरोपी अटकेत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, ४ जून, २०२३

demo-image

मोटर कार चोरी करणारा तसेच कारची काच तोडून किंमती वस्तू चोरी करणारा आरोपी अटकेत

फिर्यादी श्री. मनिष महेंद्र शहा, वय - 53  वर्षं यांनी पोलीस ठाणेस येवुन कळविले कि, त्यांनी त्यांची मो/कार क्र MH 01 EB 5266  प्रिययदर्शनी गार्डनच्या समोर पार्क केली आणि  गाडीला त्यावेळी चावी  विसरून राहिली होती  दरम्यान त्यांनी त्यांचे माॅर्निंग वाॅक सकाळी 06.40 ते 08.10 दरम्यान पूर्ण करून ते प्रियदर्शनी गार्डनच्या बाहेर आले असता त्यांना त्यांची गाडी ज्याठिकाणी पार्किग केली होती तेथे मिळून आली नाही, म्हणुन त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता कार कोठेही दिसून आली नाही त्यानंतर ते त्याच्या घरी गेले तेव्हा त्यांची खात्री झाली कि, त्यांची MH 01 EB 5266 ही मो/कार कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे म्हणुन तक्रार  देण्यासाठी पोलीस  ठाणेस आले तेव्हा  त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.क्र 54/2023 कलम 379 भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


गुन्ह्याचा तपास :- नमूद गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी जुनेद उर्फ बंबईया उर्फ बावा युनूस शेख याला सुरत, गुजरात येथे अटक केल्याची माहिती प्राप्त झाली. मा. न्यायालयाचे आदेश प्राप्त करुन सदर आरोपीताचा ताबा घेण्यात आला व त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयामध्ये चोरीस गेलेल्या मोटर कारची चावी आरोपीकडुन हस्तगत करण्यात आली आहे तसेच चोरीस गेलेली मोटर कार यापुर्वीच हस्तगत करण्यात आली आहे. अटक आरोपीला आज दि. 03/06/2023 रोजी मा. महानगर दंडाधिकारी, 40 वे न्यायालय, गिरगांव, मुंबई यांच्यासमक्ष रिमांडकामी हजर केले.


अटक आरोपीचे नाव व पत्ता :- जुनेद उर्फ बंबईया उर्फ बावा युनूस शेख, वय - 33 वर्षे, व्यवसाय - एसी फ्रिज दुरुस्ती, रा.ठी. 1301, बी विंग, सर्वोदय अपार्टमेंट, एस.व्ही. रोड, खार वेस्ट, मुंबई


हस्तगत मालमत्ता :-

1) ₹ 30,00,000 हुंदाई टक्सन मोटर कार MH 01 EB 5266

2) ₹ 00.00 मोटर कारची चावी


  गुन्हें अभिलेख :- 


1) गुजरात गांधीनगर, अडालज पोलीस ठाणे गु.र. क्र.०५/१६ कलम ३७९,४२७ भादवि


02) गुजरात गांधीनगर, अडालज पोलीस ठाणे गु.र. क्र.०९/१६ कलम ३७९,४११ भादवि


03) गुजरात गांधीनगर, अडालज पोलीस ठाणे गु.र. क्र.१०/१६ कलम ३७९,भादवि


04) गुजरात गांधीनगर, अडालज पोलीस ठाणे गु.र. क्र.१३०/१५ कलम ३७९,भादवि


05) गुजरात गांधीनगर, अडालज पोलीस ठाणे गु.र. क्र.१४०/१६ कलम ३७९,भादवि


06) गुजरात गांधीनगर, अडालज पोलीस ठाणे गु.र. क्र.१४६/१६ कलम ३७९ भादवि


07) गुजरात अहमदाबाद,  युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ४०/१६ कलम ३७९ भादवि


08) गुजरात अहमदाबाद,  युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ५५/१६ कलम ३७९ भादवि


09) गुजरात अहमदाबाद,  वस्त्रापुर पोलीस स्टेशन ८५/१६ कलम ३७९, भादवि


10) गुजरात अहमदाबाद,  वस्त्रापुर पोलीस स्टेशन १२५/१६ कलम ३७९ 


11) गुजरात अहमदाबाद,  वस्त्रापुर पोलीस स्टेशन १६८/१६ कलम ३७९ भादवि


12) गुजरात अहमदाबाद,  वस्त्रापुर पोलीस स्टेशन ११३/१७ कलम ३७९ भादवि


13) गुजरात अहमदाबाद, गुजरात सॅटेलाइट पोलीस स्टेशन ९८/१६ कलम ३७९,४६१ भादवि


14) महाराष्ट्र मुंबई, दादर पोलीस ठाणे गु.र.क्र. ५४/२०२१, कलम ३७९ भादवि


महाराष्ट्र मुंबई, डीसीबी सीआयडी पोलीस ठाणे गु.र.क्र. ८३/२०२१ कलम ३७९,४२७ भादवि


सहा. पोलीस निरीक्षक निलेश बनकर, पो शि संदे, पो शि धारवाडकर, पो शि कदम यांनी सदर उत्कृष्ट तपास केला आहे. अशी माहिती मलबार हिल पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,  व.पो.नि. राजन राणे यांनी दिली आहे.

      

Press note


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *