सन-२०१७ पासून चड्डी बनियन घालून घरफोड्या करून परराज्यात पळुन जाणाऱ्या अट्टल सराईत आरोपीस घाटकोपर पोलीस ठाणे कडून जेरबंद
गुन्हा नोंद क्रमांक व कलम -
गु.र.क्र. 176/2023 कलम. 454, 457, 380 भा.द.वी.
फिर्यादीचे नाव व पत्ता -
श्री.अभय प्रमोद गोकानी, राठी.102, तक्षशिला किंग्डम, नाथानी रोड, विद्याविहार (प.) मुंबई.
गुन्हाचे घडल्याचे ठिकाण-
102, तक्षशिला किंग्डम, नाथानी रोड, विद्याविहार पश्चिम मुंबई.
गुन्हा घडला दि. व वेळ-
*दिनांक 11/04/2023 रोजी 15:00 वाजे पासून 14/04/2023 रोजी 08:45 वाजताच्या दरम्यान.
गुन्हा दाखल दिनांक
दिनांक 14/01/2023 वेळ 19:56 वाजता.
गुन्ह्य़ाची थोडक्यात हकीकत-
*यातील नमूद तारीख वेळ व ठिकाणी यातील फिर्यादी हे दिनांक 11/04/2023 ते 14/04/2023 रोजी लोणावळा येथे फिरायला गेले असताना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे राहते घराचा बेडरूमच्या खिडकीचे संरक्षक ग्रील तोडून आत प्रवेश करून बेडरूम मधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ड्रॉवर मधील रोख रक्कम रुपये 74.000/- व रू. 24,00,000/- ची ज्वेलरी अशी एकूण कि.रू. 24,74,000/- ची मालमत्ता घरफोडी करून चोरून नेली म्हणून फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून गुन्हा नोंद क्र. 176/2023 कलम 454, 457, 380, भादवी अन्वये नोंद.*
चोरीस गेलेली मालमत्ता -
*1) रू.74000/- रोख रक्कम व किमंत अंदाजे 24,00,000/- रू ज्वेलरी एकूण अंदाजे की. Rs. 24,74,000/-
गुन्ह्याचा तपास -
सदर गुन्ह्याच्या घटनेच्या व गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पाहिजे आरोपीचा शोध घेणे कामी पोलीस उप आयुक्त झोन -7 श्री. पुरुषोत्तम कराड, सहा. पोलीस आयुक्त घाटकोपर विभाग श्री. दिपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके व प्रमोद कोकाटे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अमलदार यांनी घनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरील, विद्याविहार रेल्वे स्थानक ते कल्याण -टिटवळा बदलापूर रेल्वेमार्गावरील, दिवा रेल्वे स्टेशन ते साबे गावतील सरकारी, ठाणा महानगर पालिकेची, खाजगी तसेच सि.सी. टी.व्ही. फूटेज उपलब्ध करून येण्या जाण्याच्या मार्गावरील 190 पेक्षा जास्त सी.सी.टी.व्हीं. कॅमेरा तपासून व 16 ठिकाणचे सेल आय डी (डम डाटा) काढुन त्याचे विश्लेषण केले. आरोपीची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास तांत्रिक व गुप्त बातमीदार कडून माहिती प्राप्त करुन पाहिजे आरोपी हा उत्तरप्रदेश राज्यात गेल्याचे खात्री केली. उत्तरप्रदेश राज्यात जाऊन त्यांच्या गावी जाऊन तिथे तांत्रिक व अल्प कालावधीत गुप्त बातमीदार तयार करून आरोपीची माहिती घेऊन स्थानिक पोलीस ठाणे बन्सी कोतवाली पोलीस ठाणे यांची मदत घेऊन, आरोपीतास ब॓सी तहसील कार्यालयासमोर गर्दीत सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीतास पोलीस ठाणेस आणून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडून खालील नमूद मालमत्ता हस्तगत करण्यात आली. नमूद आरोपीस अटक करून ट्रांजिस्ट रिमांड घेऊन घाटकोपर पोलीस ठाणेस आणून त्यास अटक केली आहे. सदर आरोपिताकडे तपास केला असता त्याने मुंबई, ठाणे व डोंबिवली परिसरात 20 ते 25 घरफोडी केल्याचे सांगत आहे.
अटक आरोपी नाव पत्ता -
1) चिंटू चौधरी निषाद, 34 वर्ष, राठी. रूम न. 01, ओमसाई चाळ, टाटा पॉवर रोड, विष्णू पाटील नगर, साबे गाव, दिवा. (पूर्व) जिल्हा ठाणे.
मुळगाव - बन्सी, जिल्हा सिद्धार्थ नगर उत्तरप्रदेश.
गुन्हे अभिलेख -
01) खांदेशवर पोलीस ठाणे. गु.र. क्र. 162/2016 कलम 454, 457, 380 भादवी.
02) खांदेशवर पो. ठाणे. गु.र. क्र. 25/17 कलम 454,457,380 भादवी.
03) खांदेशवर पोलीस ठाणे गु.र. क्र. 161/2017 कलम 454, 457, 380 भादवी.
04) खांदेशवर पोलीस ठाणे. गु.र. क्र. 74/2017 कलम 454, 457, 380 भादवी.
05) विरार पोलीस ठाणे. गु.र. क्र. 47/2015 कलम 454, 457, 380 भादवी.
उघड गुन्ह्याची माहिती -
01) कासारवडवली पो.ठाणे गु.र. क्र. 125/2023 क.454, 457, 380 भादवी.
02) टिळकनगर पो.ठाणे. गु.र. क्र. 476/2023 क. 454, 457, 380 भादवी.
03) एम.एच.बी. पो. ठाणे. गु.र. क्र. 704/2020 क. 454, 457, 380 भादवी.
04) मुंबई, ठाणे, व डोंबिवली. परिसरात 20 ते 25 घरफोड्या केल्याची कबुली देत आहे.
हस्तगत मालमत्ता -
1) 12,00,000/- रुपये किमतीचे 200 ग्रॅम पिवळ्या धातूची लगड (सोने)
2) 25000/- रुपये रोख रक्कम.
3) 5000/रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल.
4) 2000/रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल.
एकूण 12,32,000 रुपये किंमतीची मालमत्ता.
तपासी अधिकारी -
1) पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे.
गुन्हे प्रकटीकरण पथक
01) पो.ह. 01455/कोयंडे.
2) पो.ह. 040704/ देवार्डे.
3) पो.ह. 050769/ कंक.
4) पो.शि. 080200/नागरे.
5) पो.शि. 07151/ बोराडे.
6) पो.शि. 113118/ गव्हाणे.
7) पो.शि. 111499/ भोकरे.
8) म.पो.शि. क्र. 09.1214/रुपाली हाडवळे. (तांत्रिक मदत- झोन-7) अशी माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा