मुंबई, दि. १० : फिर्यादी व पिडीत हे बेरोजगार असुन यातिल आरोपींनी मर्चन्ट नेव्हित नोकरी देण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये साकीनाका परीसरात अग्याता मरिन्स, अलार्डस शिपमेन्ट नावाने कार्यालये उघडली. त्या ठिकाणी फिर्यादी व इतरांना परदेशात व मर्चन्ट नेव्हित नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून रोख तसेच बँक खात्यांवर पैसे घेऊन ओरिजनल पासपोर्टस् तसेच सि.डी.सी. ताब्यात घेतले व कोणतीही नोकरी न देता अचानक कार्यालय बंद करून दिलेले पेसे व कागदपत्रं घेऊन पळून गेले. अशाप्रकारे फिर्यादी व इतरांची आतापर्यंत एकुण ४३,००,०००/- रूपयांची फसणूक झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने साकीनाका पोलीस ठाणेस गु.र.क्र१०६/२३ कलम ४२०,३४ भा.दंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
तांत्रीक तपासाच्या आधारे यातील आरोपी यांचे कॉल सेन्टर नोएडा, दिल्ली येथे असल्याचे व तेथून अशा प्रकारचे गुन्हे हाताळले जात असल्याचे दिसून आल्याने गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सपोनि अर्जुन क॒दळे व पथक यांनी नोएडा, दिल्ली येथे जाऊन तांत्रीक तपास केला असता आरोपी हे नोएडा येथे वेगवेगळया ठिकाणी कार्यालये चालवत असल्याचे आणि वेगवेगळया ठिकाणी फ्लॅट्स् घेऊन रहात असल्याचे दिसून आले. पथकाने तांत्रीक तपास करून यातिल मुख्य सुत्रधार आरोपी शिवम कुमार गुप्ता व उदित सिंग यास नोएडा येथून अटक केली आहे. गुन्हयात अद्यापपावेतो एकुण तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असुन आरोपींचे वेगवेगळे बॅक खाते गोठवण्यात आले आहेत. तसेच तपासादरम्यान फिर्यादी व पिडीत यांचे एकुण १२७ पासपोर्टस् व सि.डी.सी. हस्तगत करण्यात आले आहेत.
शिवमक्मार राजेशकुमार गुप्ता, उदीत कमल सिंग, सिद्धार्थ कमल बाजपेयी अशी अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. . तपासादरम्यान यातील अटक आरोपी व पाहिजे आरोपी हे आपसात पुर्वनियोजीतपणे आपसात कट करून नोएडा, दिल्ली येथून मुख्य कार्यालय काढून तेथून कॉल सेन्टरद्वारे वेगवेगळया शहरांत तात्पुरत्या स्वरूपात जॉब प्लेसमेन्टचे कार्यालये उघडतात, कार्यालयांच्या नावे वेबसाईटस् तसेच फेसबुक पेज बनवून अशाप्रकारचे फसवणूकीचे गुन्हे करत असल्याचे तपासात दिसून आले आहे. तपासाअंती गुन्हयात कलम १२०(९ब) भा.दंवि. कलमाची वाढ करण्यात आली आहे.
याबरोबरच यातिल अटक आरोपींनी इतर आरोपींशी संगणमत व नियोजीत कट करून यापुर्वी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, गुजरात, राजस्थान, लखनौ येथे अशाचप्रकारचे गुन्हे केले असल्याची माहिती प्राप्त आहे.
सदरची कागगिरी मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस उपायुक्त परीमंडळ १९०, मा. भारतकुमार सुर्यवंशी, सहायक 'पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली | साकीनाका विभाग, श्री बळवंत देशमुख, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, साकीनाका पोलीस ठाणे, श्रीमती सपना क्षिरसागर, पो.नि. गुन्हे यांच्या सुचनेनुसार गुन्हेप्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. अर्जुन कुदळे, स.पो.नि. थिरज गवारे, पो.ह. पाटील, पो.ह. खैरमोडे, पो.ह. भुवड, पो.ना. गायकर, पो.ना. पिसाळ, पो.शि. जाधव यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. चौधरी करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा