मुंबई, दि. १: चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे प्रणेते युगपुरुष लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त (३१ जुलै २०२२) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन नायर हॉस्पिटल रक्तपेढी, वाडिया रुग्णालय रक्तपेढी, सिव्हिल रुग्णालय रक्तपेढी तसेच सर जे. जे. महानगर रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित केले होते.
रक्तदान शिबिराचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
सदर रक्तदान शिबिर आज ९०० रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचा वाटा उचलला. मंडळाच्या वतीने रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा