मुंबई : रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी शिताफीने चोरून न्यायच्या आणि महिना दीड महिना गोवंडी परिसरात लपवून ठेवायच्या. नंतर एखादा ग्राहक शोधून त्या विकायच्या. अशाप्रकारे गुन्हे करणारा सराईत दुचाकी चोर भायखळा पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या १४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
भायखळा परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याने वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुहास माने, उपनिरिक्षक सचिन पाटील तसेच दशरथ सोनवणे , पाटील, राठोड, गावीत, जगताप आदींचे पथक गाडी चोरांचा शोध घेत होते. दरम्यान रे रोड रेल्वे स्थानक परिसरात सदर पथक गस्त घालत असताना इस्माईल शेख(वय, ४८) ही व्यक्ती एका दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याजवळ असलेली दुचाकी चोरीची असल्याचे कळले. रेकॉर्ड तपासले असता इस्माईल हा सराईत चोर असल्याचे समजले. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत २६ गुन्ह्यांची नोंद आहे.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा