युट्युब पाहून करायचा तरुणींचे व्हाट्सअप हॅक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, २४ जुलै, २०२२

demo-image

युट्युब पाहून करायचा तरुणींचे व्हाट्सअप हॅक

बनावट नंबर वर घेतले ११ सिमकार्ड


मुंबई : युट्युब पाहुन तरुणी आणि महिलांचे व्हॉट्सअप हॅक करून त्यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला अंधेरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रवी दांडू असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ७ मोबाईल आणि ११ सीमकार्ड जप्त केले आहेत. रवी ज्या बँकेत काम करायचा तेथील महिलांनादेखील त्याने अश्लील मेसेज पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीला फेब्रुवारी महिन्यात एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपण कॉलेजचा शिक्षक बोलत असल्याचे भासवले. शिक्षणासाठी कॉलेजचा व्हाट्सअप ग्रुप तयार करायचा आहे असे सांगून तरुणींकडून ओटीपी घेतला. ओटीपी घेतल्यानंतर त्याने तरुणीचे व्हाट्सअप हॅक केले. त्यावरून अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले. याप्रकरणी तरुणीने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिमंडळ-१० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सहाय्यक निरीक्षक दिगंबर पगारे यांच्या पथकातील राजेंद्र पेडणेकर, सूर्यवंशी जाधव आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सिडीआर काढला. त्यावरून पोलिसांनी रवीला धारावी येथून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल हस्तगत केला असून तो लवकरच फॉरेन्सिक लॅबला पाठवला जाणार आहे.

CRIME


 मजेसाठी पाठवायचा मेसेज


रवी हा मौजेसाठी महिलांना अश्लील मेसेज पाठवायचा. मेसेज पाठवल्यावर तो त्या नंबरचा फोन बंद करून ठेवायचा. त्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या महिला सहकाऱ्यांनादेखील अश्लील मेसेज पाठवले होते. त्याने मोबाईलमध्ये 'रश' नावाने ३०० महिलांचे नंबर सेव्ह करून ठेवले आहेत. त्याच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप क्लोनचे काही ॲपस आढळून आले  आहेत. त्याने विकत घेतलेले ते  फोन चोरीचे असल्याचा पोलिसांना संशय आहे.


रवी हा ऐरोली येथील एका खासगी बँकेत कामाला आहे. लॉक डाऊनपूर्वी रवीला रस्त्यात एक कार्ड मिळाले. त्या सिम कार्डवर रवीने व्हाट्सअप ऍक्टिव्ह करून ते कार्ड फेकून दिले होते. लॉक डाऊनमध्ये घरी असताना त्याने युट्युबवर व्हाट्सअप कसे हॅक करायचे त्याचे व्हिडीओ देखिल पाहिले होते. रवीने बनावट नावाने ११ सिमकार्ड आणि ७ मोबाईल विकत घेतले होते.



%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9C%20%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87_page-0001


Press Note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *