अपहृत लहान मुलीची ३ तासांत सुटका करून आरोपीस २४ तासामध्ये गावदेवी पोलीस ठाणेकडून अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ११ मे, २०२२

demo-image

अपहृत लहान मुलीची ३ तासांत सुटका करून आरोपीस २४ तासामध्ये गावदेवी पोलीस ठाणेकडून अटक

 चिमुकलीला शोधून अपहरण कर्त्याला 
१२ तासांच्या आत अटक

मुंबई, दि.११ : दि. ०६/०५/२०२२ रोजी फिर्यादी श्री राजु सुभाष पाल, वय ४१ वर्षे, रा.ठि.- केनेडी ब्रिजच्या डाव्याबाजुला फुटपाथवरील झोपडपट्टी ज्योती कंपाउंड शेजारी, गावदेवी, मुंबई यांनी त्यांची अडीच वर्षांची मुलगी सापडत नाही अशी गावदेवी पोलीस ठाणेस दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात गावदेवी पोलीस ठाणे गु.र.क्र.२१४/२०२२ कलम ३६३, ३५४ भांदवि सह कलम ८, १०, १२ पोक्सो कायदान्वये गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला.

2


सदर गुन्हयाची संवेदनशीलता पाहाता गुन्हा शीघ्र उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या ३ टीम तयार करण्यात आल्या. दरम्यान खाजगी आणि सरकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्मातून तपास करण्यात आला असता, कोणीतरी अज्ञात इसम सदर अपनयन झालेल्या मुलीस घेवून जात असताना दिसून आला.


 सदर जाणाऱ्या इसमाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यातून आणि गुप्त बातमीदारामार्फत शोध घेवून तिची ३ तासांच्या आत अपनयन झालेल्या मुलीची सेंट्रल स्थानक परिसरातून सुखरूप सुटका करण्यात आली. त्याचप्रमाणे पाहिजे आरोपीतास अटक करण्याच्या दृष्टीने अथक परिश्रम करण्यात येवून अंधेरी परिसरातूनकनमुद गुन्हयातील आरोपी नामे सुनील रामचंद्र भुवड, वय ४३ वर्षे, रा.ठि., फुलपाडा, विरार (पूर्व), पालघर यास २४ तासांच्या आत अटक करण्यात आली आणि अपहृत मुलीस तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले.


 सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग श्री. दिलीप सावंत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ श्री. नीलोत्पल यांच्या मागदर्शनाखाली स.पो.आ. गावदेवी विभाग श्री. निळकंठ पाटील, व.पो.नि.गिरप, पो.नि. यादव, पो.नि. दंडवते, पो.नि. राजे, स.पो.नि. धनेश सातार्डेकर, पो.उ.नि., डोरकुले, पो.ह. परब, पो.ना.कोळी, जाधव, कदम, तोडणकर, पो.शि.राणे, कदम या पथकाकडून कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने २४ तासांमध्ये उघडकीस आणून अपहृत लहान मुलीची सुखरूप सुटका केली.









Press%20Note%20Gamdevi%20PS_page-0001




Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *