श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन वेळा जाहीर
मुंबई : उद्या मंगळवार, दिनांक १९ एप्रिल रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री सिद्धिविनायकाच्या महापूजा, नेवेद्य, आरती व दर्शनाच्या वेळा जाहीर करण्यात आल्या आहेत. श्रींची महापूजा, नैवेद्य व आरतीच्या वेळा पहाटे १२.१० वा. ते ०१.३० असतील. काकड आरती महापूजा पहाटे ३.१५ वा. ते पहाटे ३.५० पर्यंत आणि आरती नैवेद्य १२.०५ वा. ते १२.३० दरम्यान होईल. सायंकाळी ७.०० वाजता धुपारती, तर रात्रौ ८.३० वा. ते रात्रौ १०.१० पर्यंत 'श्रीं' ची महापूजा, नैवेद्य व आरती होईल.
सोमवार मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.१५ वाजेपर्यंत, पहाटे ३.५० ते रात्रौ ८.१५ वाजेपर्यंत, रात्री १०.१० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत श्रींचे दर्शन घेता येईल, असे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती नंदा राऊत यांनी कळवले आहे.
पुरुष भाविकांकरिता रचना संसद (शाह आणि सांधी) येथून तर महिला भाविकांकरिता सिल्व्हर अपार्टमेंट येथून दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असून, भाविकांनी दर्शनाला येताना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू कॅमेरा, लॅपटॉप, टॅब, मोठी बॅग आणू नये, असे अवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा