मुंबई : धारावीमध्ये ४० लाख ७५ हजार रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. कोळीवाडा परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने अटक केली आहे, तर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १० नेदेखील ३० लाखांचे एमडी व कोकेन हस्तगत केले आहे.
वांद्रे युनिटने सुनील शिशुपाल नायक (४५) आणि नेवाजी अलिमन मिया (६०) या दोघांना अटक केली आहे. धारावीच्या यूएम. तेवर मार्ग याठिकाणी सापळा रचत त्यांना अटक केली. त्यांच्याकडून २ किलो २५ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला, तर गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने २०० ग्रॅम एमडी, तसेच ८४ ग्रॅम कोकेन, तसेच १ मोबाइल ताब्यात घेतला. अंघेरीच्या आझाद नगर मेट्रो स्थानकाजवळ सापळा रचत हे अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा