मुंबई, दि.२७ : मंडळाच्या विद्यमाने शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी दिवाळी निमित्त मु. बेंदरपाडा सारशी पो. तलवाडा ता. विक्रमगड. जिल्हा पालघर येथील आदिवासी पाड्यात जाऊन तेथील गरीब कुटुंबांना फराळ साहित्य(रवा, मैदा, साखर, बेसन, डालडा आणि तेल), ब्लँकेट, साबण, चहापत्ती, नारळ, बिस्कीट, खेळणी आणि कपडे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमामुळे सदर पाड्यातील लोकांचा आनंद आणि उत्साह हा त्यांच्या बोलण्यातून दिसून आला.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष संतोष सकपाळ, सरचिटणीस गणेश काळे, खजिनदार शंकर साळवी तसेच तेथील स्थानिक किरण पंडित - सामाजिक कार्यकर्ते, प्रकाश गिंभल - ग्राम पंचायत सदस्य, भारती सापटा - ग्राम पंचायत सदस्य, रमेश खांजोडे - पोलीस पाटील, मनोज कुऱ्हाडा - शिक्षक तसेच मंडळाचे पदाधिकारी - श्याम आचरेकर, मंगेश पिंपरकर, बाळा खोचरे, प्रमोद साळवी, राजू माणगावकर, अशोक भास्कर, योगेश राणे, विनायक येंधें, विनोद मकवाना, संदीप सकपाळ, बाळा हांडे आणि गिरीश मकवाना आदी कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा