भक्तांच्या हाकेला धावणारी दुर्गामाता - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

demo-image

भक्तांच्या हाकेला धावणारी दुर्गामाता

मुंबई, दादासाहेब येंधे : रंगारी बदक चाळ, काळाचौकी येथील समर्थ हनुमान मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रौत्सवात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असून भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिची महाराष्ट्रभर ख्याती आहे. गुजराती, मराठी, बंगाली अशा सर्व धर्मीयांची मंडळी या देवीला साकडे घालण्यासाठी नवरात्र उत्सवात गर्दी करताना दिसून येतात. भक्तांना दृष्टांत देणाऱ्या या मातेचे कधीही विसर्जन होत नाही. हे खास वैशिष्टय आहे.

IMG20241006094650

श्री समर्थ हनुमान मंडळ यांचेतर्फे दरवर्षी नवरात्रोत्सवा दरम्यान महिलांकडून मोठया प्रमाणात देवीच्या नावाचा जप (नामस्मरण) करून घेतला जातो. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा,  होम मिनिस्टर, वक्तृत्व स्पर्धा, लहान मुलांसाठी बडबड गीते, कॅरम -बुद्धिबळ, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. भजन तसेच गरबा-दांडिया रास आयोजन करण्यात आले आहे. 

IMG20241004224303
देवीचे जागरण-गोंधळ

IMG20241005204858
भजन

IMG20241006223021
शक्तीवाले, तुरेवाले

IMG20241006170401
नामस्मरण, जप

सदर मंडळात तरुण-तरुणींचा मोठया प्रमाणात सहभाग असून मंडळाचे अध्यक्ष सौ. कांता कदम, कार्याध्यक्ष सौ. रेश्मा माणगांवकर, सरचिटणीस सौ. छाया दळवी, खजिनदार सौ. रोहिणी परब आदींच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रौत्सव यावर्षी अधिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी होमहवन, भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *