कंपाउंडर झाला डॉक्टर - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

demo-image

कंपाउंडर झाला डॉक्टर

पाच जणांकडून रुग्णांवर अलोपॅथी उपचार, गोरेगाव मध्ये सहा जणांवर कारवाई


मुंबई  : दिनांक ११/०२/२०२२ रोजी कक्ष-१०, गुन्हे प्रकटीकरण शाखा येथील स.पो.नि. धनराज चौधरी यांना गुप्त बातमीदाराने खबर दिली की, गोरेगाव पोलीस ठाणेच्या हद्दीतील प्रेम नगर, तीन डोंगरी, गोरेगाव प, मुंबई. परिसरात काही इसम डॉक्टर नसतांना वैद्यकिय व्यवसाय करीत आहेत. सदर प्रापत खबरीबाबत स.पो.नि धनराज चौधरी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेशकुमार ठाकूर यांना अवगत केले. त्यांनी प्रापत खबरीची शहानिशा करून कारवाई करणेकामी कक्षातील अन्य पोलीस अधिकारी व अंमलदार यांना समक्ष बोलावून नियोजनबध्द सापळा रचून छापा टाकण्याची योजना आखली.

.com/img/a/


दिनांक ११/०२/२०२२ रोजी १०:०० वा. गोरेगाव पोलीस ठाणेच्या हद्दीतील तीन डोंगरी, प्रेम नगर, गोरेगाव प, मुंबई. येथे सहा. वैद्यकिय अधिकारी, बृहन्मुंबई महानगर पालिका आणि पंच यांचेसह कक्ष-१० येथील पोलीस पथकाने छापा टाकला असता १) इब्रार ताजमुल सय्यद, वय २४ वर्षे, (कंम्पाऊडंर) (डॉ.मुकेश यादव क्लिनीक) २)डॉ. सर्वेश संपत्ती यादव, वय ३१ वर्षे, (श्री कृष्णा क्लिनिक) ३) डॉ. छोटेलाल राधेश्याम यादव, वय ३३ वर्षे, (आयुष क्लिनिक) ४) डॉ.ओमप्रकाश श्रीराम यादव, वय ४५ वर्षे, (ओम क्लिनिक) ५) डॉ. सपना पवन यादव, वय २९ वर्षे, (युवान क्लिनिक) या ठिकाणी पोलीस पथकाने स्वत:ची तसेच पंच व महानगर पालिकेच्या सहाय्यक वैद्यकिय अधिकारी यांची ओळख सांगून त्याचेकडील वैद्यकिय प्रमाणपत्रांची मागणी केली असता १) इब्रार ताजमुल सय्यद, वय २४ वर्षे, हा डॉ. मुकेश यादव क्लिनीक मध्ये कंम्पाऊडर असुन डॉक्टरांच्या अनुपस्थित पेंशट यांना उपचार देताना आढळून आला. २) डॉ. सर्वेश संपत्ती यादव, वय ३१ वर्षे, ३) डॉ.छोटेलाल राधेश्याम यादव, वय ३३ वर्षे ४) डॉ. ओमप्रकाश श्रीराम यादव, वय ४५ वर्षे ५) डॉ.सपना पवन यादव, वय २९ वर्षे, यांचेकडे अलोपॅथीक उपचार करण्यासाठी आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र नसताना देखील ते पेशंटना ऑलोपॅथिक उपचार देताना आढळून आले आहेत.


वरील सर्व आरोपी हे वैद्यकिय व्यवसाय करीत असलेल्या जागेतून स्टेस्थोस्कोप, रबर स्टॅम्प, प्रिस्क्रीप्शन बुक, अँलोपॅथी डॉक्टर रुग्णांकरिता वापर करीत असलेल्या औषधांच्या गोळयांची पाकीटे, इंजेक्शन, सिरप, सिरींज, आयव्ही सेट, टयुब, त्याचे वैद्यकिय नोंदणी प्रमाणपत्राची छांयाकित प्रती, ओळखपत्र, तसेच डॉ. मुकेश यादव यांनी इब्रार सय्यद, याचे नावे दिलेले नियुक्‍तीपत्र अशा वस्तू ताब्यात घेतल्या. ताब्यात घेतलेला मुद्देमाल गोरेगांव पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहा. वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नमूद इसमाच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाणे, मुंबई येथे गु.र.क्र. ७५/२०२२ कलम ४१९, ४२०, ३३६ भादंविसं.सह ३३,३६ वैद्यकिय व्यवसाय अधिनिमय १९६१. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाणे करीत आहे.


सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस सह आयुकत (गुन्हे) श्री. मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्‍त (गुन्हे) श्री. एस. विरेश प्रभू, मा. पोलीस उप आयुक्‍त (प्रकटीकरण-१) गुन्हे शाखा, श्री. संग्रामसिंह निशाणदार, मा. सहाय्यक पोलीस आयुक्‍त (डि-पश्‍चिम) गुन्हे शाखा श्री. दिपक निकम तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेशकुमार ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली, कक्ष-१० गुप्रशा, मरोळ मुंबई येथील पो.नि लोंढे, स.पो.नि सांडभोर,स.पो.नि.चौधरी, स.पो.नि तोडकर, स.फौ. माने, पो.ह.क्र. ३१००१/ कांबळे, पो.ह.क्र. ३१८९०/शेटे, पो.ह.क्र. ३४१६६/धारगळकर, पो.ना.क्र. ९७०५३३/धनवडे, पोना ००७३९/चवरे, पो.ना.क्र.०३.०९४६/चिकणे, पो.ना.क्र. ०३.६५६/जगताप, पो.ना क्र. ०४. ०८८८/शिंदे, म.पो.ना.क्र. ०६.१२३६/चौगुले, पोशिक्र.०६.१९३२/पानसरे, म.पो.शि ०८.१३७६/सोनवणे, पोशिक्र. ०९१५८०/डफळे,पो.शि.चा.क्र.१५.०९२९/चव्हाण यांनी पार पाडली.















.com/img/a/








Press Note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *