५ जण मृत, ३०जण जखमी
मुंबई : काल शनिवारी ग्रँडरोड येथील इमारतीला भीषण लागलेल्या आगीत ५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर ३० जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयांत दाखल केले आहे.
दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील 'कमला' या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर काल शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा