भायखळा येथील ग्लोरिया शाळेतील विद्यार्थिनींचे आंदोलन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, १५ जानेवारी, २०२२

demo-image

भायखळा येथील ग्लोरिया शाळेतील विद्यार्थिनींचे आंदोलन

आगीस कारणीभूत असलेल्यांवर कारवाईची मागणी

मुंबई, दादासाहेब येंधे : 'महापौर मॅडम, आमच्या मुली शाळेतून घरी सुरक्षित पोहोचतील ना..?' असा सवाल भायखळा येथील ग्लोरिया कॉन्व्हेंट हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुक्रवारी मूक निदर्शने करून केला. शाळेसमोरील लाकडी गोदामांना सोमवारी लागलेल्या भीषण आगीत दीडशे विद्यार्थ्यांचे जीवन थोडक्यात बचावले होते. मात्र, या आगीचे फायर ऑडिट किंवा पोलिस पंचनामा झालेला नसतानाही पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरू झाल्याने पालकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.


या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी व पालकांनी केली आहे. मुंबईच्या महापौर बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्लोरिया कॉन्व्हेंट हायस्कूल या आगीत शाळेच्या समोरील बाजूस असलेल्या  लाकडी गोदामांना सोमवारी आग लागली होती. या आगीत शाळेच्या तिन्ही मजल्यांचे नुकसान झाले होते. या आगीचे फायर ऑडिट झालेले नसतानाही तसेच पंचनामा झाला नसतानाही पुन्हा दुमजली उंचीचे अनधिकृत बांधकाम येथे  पुन्हा उभे राहिल्याचा आरोप पालक श्री. खांडगे यांनी केला आहे.

शुक्रवारी विद्यार्थिनी आणि पालक यांनी मिळून निदर्शने केली.
.com/img/a/

.com/img/a/

.com/img/a/

.com/img/a/

.com/img/a/




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *