जुहूच्या जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : फसवणुकीसाठी बोगस शासकीय दस्तावेजाचा वापर करणाऱ्या एका हायफाय टोळीचा घाटकोपर युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. जुहूच्या जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये छापा टाकून पोलीसांनी मुख्य आरोपीसह चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बोगस दस्तावेज, मोबाईल, लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
भास्करराव रामलू येसुगोपु, अरीनदराम अरिदमकुमार डे, विनय रतनाम नायर उर्फ राजविंद्र अशोक मेहरा आणि सुमित मुकूंद नागराळे उर्फ सुमित कमाल पंजाबी अशी या चौघांची नवे आहेत. चौघांना मंगळवार ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तक्रारदार व्यावसायिक असून त्यांना त्यांच्या एका मित्राकडून भास्करराव विषयी माहिती मिळाली होती. भास्करराव हा आंध्रप्रदेशचा रहिवाशी असून तो सध्या जुहूच्या जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. त्याला आर्थिक मदत केल्यास त्याच्याकडून त्यांना चांगला परतावा मिळेल, असे सांगितले.
ते त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्याने एका विदेशी कंपनीला एक प्रिशियस मेटल पॉट विकला आहे. या कंपनीकडून १५ बिलियन युरो मिळणार असून त्यापैकी १५ बिलियन युरो मिळणार असून त्यापैकी कंपनीने खात्यात ५५ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. मात्र, हि रक्कम फॉरेन एक्स्चेंज, आरबीआयने गोठवून ठेवली आहे. हि रक्कम प्राप्त करण्यासाठी २७ कोटी रुपयांची गरज आहे. त्यामोबदल्यात त्यांना ४० टक्के कमिशन देण्याचे मान्य केले आहे.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा