पहाटेच्या अंधारात रस्त्यावर शुकशुकाट असल्याने ठाणे येथील नौपाड्याच्या गोखले रोड येथील सहा दुकाने शुक्रवारी एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडली. यामध्ये चार दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला असून दोन दुकानांमधील मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे. पोलिसांचे गस्ती पथक येत असल्याचे पाहून चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी काही मोबाईल आणि एकूण ४९ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली असून शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश पायरे यांचे इस्टेट एजंट कन्सल्टंट कार्यालयही चोरट्याने फोडले. या घटनेत परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
0 टिप्पण्या