मुंबई : अंधेरी पश्चिम येथील जुहू गल्लीत तीन मजली घरांचे बांधकाम सूरु असताना मंगळवारी मध्यरात्री भिंत बाजूच्या खोल्यांवर पडल्याने पाच जण जखमी झाले. या पाचही जणांवर विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मेहता बाबा चाळीतील तीन मजली घराचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहीती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, विभाग कार्यालयातील कर्मचारी व ७५ कामगार मदतकार्यासाठी दाखल झाले. ढिगारा उपसून त्याखालील अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले.

0 टिप्पण्या