मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा वाढदिवस (पूरस्थिती आणि कोरोनामुळे) अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले होते. कुणीही पोस्टर, बॅनर लावू नयेत असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहनही केले होते. त्यांच्या या आवाहनाला अनुसरून भायंदर येथील स्थानिक नगरसेवक यांनी पक्षाचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांची मदत घेऊन उत्तन समुद्रकिनारा साफसफाई केली. यावेळी स्थानिक नागरिकांबरोबरच या अभियानात पोलिसांनीही आपला हातभार लावला.

0 टिप्पण्या