मुंबई : अतिवृष्टीचा इशारा घेऊन आलेल्या पावसाने एंट्रीलाच मुंबई लॉक केली. मंगळवारी रात्रीपासून सुरु झालेल्या मान्सूनपूर्व सरींचे आल्हाददायक स्वरूप बुधवारी सकाळपर्यंत मान्सूनमध्ये कधी परावर्तित झाले हे, मुंबईकरांना कळायच्या आतच मुसळधार ते अतिमुसळधार सरींनी मुंबईला झोडपून काढले नव्हे लॉकडाऊन करून दाखविले.
बुधवारी मुंबईतील रस्ते पाण्याखाली गेल्याने बेस्ट, टॅक्सी, लोकल वाहतूक कोलमडल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. मध्ये रेल्वेच्या कुर्ला ते सायनदरम्यानच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची रेल्वे वाहतूक रात्री ७ वाजेपर्यंत बंदच होती. संध्याकाळी जवळजवळ १० तासांनी म्हणजे संध्याकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई लोकल पुन्हा सुरु झाली. बेस्ट गाड्यांसह इतर वाहनांचा वेगही दिवसभर मंदावलेला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा