मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चैत्यभूमी येथे अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण केले.
यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व इतर मान्यवरांनी देखील अभिवादन केले.
वर्षा निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथील समिती कक्षात डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा