नाताळ साधेपणाने साजरा करा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

demo-image

नाताळ साधेपणाने साजरा करा

 नाताळ साधेपणाने साजरा करा - राज्य सरकार

मुंबई, दादासाहेब येंधे : नाताळ सण दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी कोविड च्या (covid-19) पार्श्वभूमीवर सर्वजण साधेपणाने सण साजरे करत आहे. त्यामुळे ख्रिश्चन बांधवांनी देखील नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. 

राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचनाही काढल्या असून त्यानुसार चर्चमध्ये ५० पेक्षा जास्त जणांनी गर्दी करू नये. ३१ डिसेंबरची प्रार्थनाही मध्यरात्री न करता सायंकाळी ७ पूर्वीच करावी. तसेच मिरवणुकांचेही आयोजन करण्यात येऊ नये असेही त्यात म्हटले आहे.

नाताळच्या दिवशी चर्चमध्ये येशूच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री यासारख्या काही वस्तू ठेवल्या जातात, त्या ठिकाणी सामाजिक अंतर राखले जावे. तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. 

चर्चमध्ये येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त १० गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर केला जावा. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने वा स्टॉल्स लावण्यात येऊ नये. तसेच ६० वर्षांवरील नागरिकांनी व १० वर्षाच्या खालील बालकांनी घरातच सण साजरा करावा. असे राज्य सरकारने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

CM+UDDHAV+THACKREY


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *