नागरिकांना फसवण्यासाठी instagram वर सापळा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १७ जुलै, २०२३

demo-image

नागरिकांना फसवण्यासाठी instagram वर सापळा

मुंबई, दि. १७ : क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंगुंतवणूक करा आणि ३० मिनिटात दुप्पट पैसे कमवा अशी खोटी जाहिरात करून नागरिकांना फसविणाऱ्या भामट्यास काळाचौकी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला या गुन्ह्यात साथ देणाऱ्या तिघा इन्फ्लुएन्सरशी नावे उघड झाली आहेत. हे तिघे पैसे गुंतवण्याची खोटी जाहिरात करत असल्याचे समोर आले आहे.

कलकत्ता येथे राहणाऱ्या मोहम्मद हमजा अन्वर (वय, २१) या तरुणाने इंस्टाग्रामवर क्रिप्टो आनायशा नावाने बनावट खाते सुरू केले होते. त्या माध्यमातून तो क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवणूक करा तीस मिनिटात दुप्पट पैसे कमवा अशी जाहिरातबाजी करत होता. एका व्यक्तीस अशा प्रकारे ७५ हजार रुपयांना फसविल्यानंतर त्या तरुणाने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

काळाचौकी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे क्रिप्टो अनायशा नावाने इंस्टावर खाते खोलून बनावटगिरी करणाऱ्या अन्वरला कलकत्ता येथे जाऊन बेड्या ठोकल्या. त्याला मुंबईत आणून त्याची चौकशी केल्यानंतर तिघांच्या माध्यमातून तो अशा प्रकारची खोटी जाहिरात करत असल्याचे समोर आले आहे. अक्षय आठारे, अंकिता भगत आणि मानसी सुरावसे अशी त्या तिघांची नावे असून त्यांच्या खात्यावर मिलियनच्या घरात फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तो या तिघांची खोटी जाहिरात करण्यासाठी वापर करत असल्याचे समोर आले आहे. 

%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *